Friday, April 10, 2020

कोरोना-१९_माजवलं खूप थैमान...

कोरोना-१९_या विषाणू ने जागतिक पातळीवर थैमान जे मांडल आहे आणि जे वास्तव आपणा सर्वांच्या समोर आहे तेच या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न....

कोरोना-१९_माजवलं खूप थैमान...

कोरोना-१९ आहे म्हणे भयाण,
जागतिक पातळीवर त्यानं
माजवलं खूप थैमान...

ढासळून टाकली त्यानं सगळी अर्थव्यवस्था,
हतबल करून ठेवली त्यानं आपली अवस्था...
सगळ्यांनाच करून ठेवलं त्यानं हैराण...
जागतिक पातळीवर त्यानं माजवलं खूप थैमान...

ऐकाचे दोन, दोनाचे करत चार,
जनतेला आणतोय तो आहारी...
भयंकर अशी आहे ही वैश्विक महामारी...
म्हणूनच एक उपाय म्हणून सांगते माणसा
अन् तोच आहे भारी...
सामाजिक अंतर पाळत सुरक्षित राहा,
तू आपल्याच घरी...
कित्येकांचे संसर्गाने जात आहेत प्राण...
जागतिक पातळीवर त्यानं माजवलं खूप थैमान...

तो थैमान माजवत आहे,
आपलं राज्य गाजवत आहे...
पण त्याला थांबवण्यासाठी मात्र
डॉक्टर्स, नर्स पोलीस अन् प्रशासन जीव घालून
धोक्यात कर्तव्य त्यांचं बजावत आहेत...
मात्र काही लोकांना नाही गांभीर्य त्याचे...
ठरविले त्यांनी एकच lockdown चे
नियम मात्र  विनाकारण मोडायचे...
वागतो आहोत कसे आपण याचे नाही त्यांना भान...
जागतिक पातळीवर त्यानं माजवलं खूप थैमान...

धर्म असो वा जात वा असो कुठला धर्मग्रंथ,
कोरोना असं काहीच मानत नाही...
मानवी देहाला संसर्ग केल्याशिवाय,
मात्र त्याला दुसरं काही पाहिजेच नाही...
अहो "अभाग्य" त्यांचं ज्यांना नाही याच ज्ञान...
जागतिक पातळीवर त्यानं माजवलं खूप थैमान...

_ प्रियंका पायघन.









No comments:

Post a Comment