Sunday, April 19, 2020

माझ्या लग्नाचा बेत...

माझ्या लग्नाचा बेत
कोरोनामुळे ज्यांच लग्न थांबलयं अशा भावी नव वर-वधुंसाठी प्रस्तुत कविता

🥳माझ्या लग्नाचा बेत...🥳


आली होती जवळच आता 
माझ्या लग्नाची डेट (Date)
एक- एक दिवसाचा उत्कंठपणे 
मी करत होतो वेट (Wait)
अन् एप्रिल मध्ये आखला होता
माझ्या लग्नाचा बेत...

डी.जे. वाला, फोटोवाला, घोडा अन् गाडी
तयारी सगळी झाली होती सेट...
अँडव्हान्स पेमेंटही त्या लोकांना दिलं होत नेट...
चीन, इटली, अमेरिका करून कोरोना भारतात आला थेट...
सगळीकडे फार वेगानं होतोय तो स्प्रेड...
अन् मोडला त्याच्यामुळे माझ्या लग्नाचा बेत...

मुलीच्या वडिलांनी तर केला होता मोठ्ठा हॉल बुकींग...
अन् लयं भरी मेन्यूचं लग्नात होणार म्हणे 
कुकींग...
एकुलत्या एक पोरीचं लग्न करणार म्हणे मी ग्रेट...
अन् मोडला कोरोनामुळे माझ्या लग्नाचा बेत...

जागतिक स्तरावरची ही समस्या खरचं फार आहे थ्रीलर...
अन् येवढ्या मोठ्या समस्येपुढे माझं लग्न आहे चिल्लर...
लग्नाचं काय ते आज नाही  झालं म्हणून नंतर करता येईल...
पण प्रश्न आहे हा की, 
या कोरोनापासून कसे वाचता येईल?

चला तर मग माझ्या बरोबर
कोरोना करण्यासाठी नष्ट...
आपण सगळे मिळून घेऊ काही कष्ट...
आणि या lockdown दरम्यान पाळू
काही नियमांची लिस्ट...
न देता कुणाच्या हातात हात...
सोशल डिस्टंसिंग ठेऊ एकमेकांत...
धुवू नेहमी साबणाने हात...
रस्त्यावर न फिरता राहू आपल्याच घरात...
कोरोनाचा असा करून नायनाट
मोडून टाकू त्याचा बेत...
अन् अखेर शेवटी आखेल मी,
माझ्या लग्नाचा बेत...
माझ्या लग्नाचा बेत...


_प्रियंका पायघन.


https://m.facebook.com/story.php?story_fbid=857253274788942&id=100015128314698

"माझ्या लग्नाचा बेत...", वाचा प्रतिलिपि वर :
https://marathi.pratilipi.com/story/hlhbdmskgkfa?utm_source=android&utm_campaign=content_share
भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!

No comments:

Post a Comment